पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्त्विकपणे वागलो आहे, आणि परमेश्वरावर भरवसा ठेवला आहे; मी घसरणार नाही. |
| 2 |
| हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा. |
| 3 |
| तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे; तुझ्या सत्यमार्गाने मी चाललो आहे. |
| 4 |
| अधम लोकांत मी बसलो नाही; कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. |
| 5 |
| दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करतो; दुर्जनांबरोबर मी बसणार नाही. |
| 6 |
| हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन; |
| 7 |
| म्हणजे मी प्रकटपणे तुझे उपकारस्मरण करीन व तुझी सर्व आश्चर्यकर्मे वर्णन करीन. |
| 8 |
| हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. |
| 9 |
| पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्यांबरोबर माझा प्राण काढून नेऊ नकोस; |
| 10 |
| त्यांचे हात उपद्रवाने भरलेले आहेत, त्यांचा उजवा हात लाचलुचपतींनी भरलेला आहे. |
| 11 |
| मी तर सात्त्विकपणे वागेन; माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर. |
| 12 |
| माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे; जनसभांत मी परमेश्वराचा धन्यवाद करीन. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/026.mp3
150
26