पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| अहो दिव्यदूतांनो, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या. |
| 2 |
| याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या; पवित्रतेच्या वैभवाने याहवेहची उपासना करा. |
| 3 |
| याहवेहची वाणी जलांवर आहे; गौरवशाली याहवेहची वाणी महा जलाशयांवर गर्जत आहे. |
| 4 |
| याहवेहची वाणी प्रतापशाली आहे; प्रभावी आहे याहवेहचा स्वर. |
| 5 |
| याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात; लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात. |
| 6 |
| लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे आणि सिर्योन तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो; |
| 7 |
| याहवेहचा आवाज कडाडतो, विजा चमकल्यासारखा. |
| 8 |
| याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात; कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात. |
| 9 |
| याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतात आणि वने पर्णहीन होतात. आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: “याहवेहचा, महिमा असो.” |
| 10 |
| याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत; याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत. |
| 11 |
| याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात; याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/029.mp3
150
29