पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे! कितीतरी लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत! |
| 2 |
| पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात, “परमेश्वर त्याची सुटका करणार नाही.” |
| 3 |
| परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात. माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात. |
| 4 |
| मी याहवेहचा धावा करतो, आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. |
| 5 |
| मी पहुडतो आणि झोप घेतो; मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात. |
| 6 |
| असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील, तरी मला मुळीच भीती वाटणार नाही. |
| 7 |
| याहवेह, उठा! हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा! माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा; त्या दुष्टांचे दात पाडून टाका. |
| 8 |
| कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/003.mp3
150
3