पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेह मी तुमची प्रशंसा करेन, कारण तुम्ही मला खोल दरीतून बाहेर काढले आहे आणि माझ्या शत्रूंना माझा उपहास करू दिला नाही. |
| 2 |
| हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला साहाय्यासाठी विनवणी केली आणि तुम्ही मला रोगमुक्त केले. |
| 3 |
| याहवेह तुम्ही मला अधोलोकातून बाहेर काढले; तुम्ही मला गर्तेत जाण्यापासून वाचविले. |
| 4 |
| अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या. |
| 5 |
| त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो, पण त्यांची कृपा जन्मभर राहते. विलाप करणे केवळ रात्रभर राहील, परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल. |
| 6 |
| माझ्या भरभराटीच्या वेळी मी म्हणालो, “मी कधीही डगमगणार नाही.” |
| 7 |
| याहवेह, तुमच्या कृपेने मला बळकट पर्वताप्रमाणे स्थिर केले होते, परंतु तुम्ही आपले मुख लपविले, तेव्हा मी भयभीत झालो. |
| 8 |
| याहवेह मी तुमचा धावा केला, मी प्रभूला कृपेची विनवणी केली. |
| 9 |
| मी चिरनिद्रीत होण्यापासून मी अधोलोकात जाण्यापासून काय लाभ? माती तुमची स्तुती करेल काय? ती तुमच्या विश्वासूपणाची साक्ष देईल काय? |
| 10 |
| याहवेह, माझे ऐका, मजवर दया करा; याहवेह मला साहाय्य करा. |
| 11 |
| तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले. तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली, |
| 12 |
| जेणेकरून मी शांत न राहता, माझ्या हृदयाने सदैव तुमची स्तुतिस्तोत्रे गात राहावे. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी सदासर्वकाळ तुमची प्रशंसा करीतच राहीन. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/030.mp3
150
30