|
| 1 |
|
| अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा; सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. |
|
| 2 |
|
| वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा; दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. |
|
| 3 |
|
| त्याच्यापुढे नवे गीत गा; जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा; |
|
| 4 |
|
| कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे; त्याची सर्व कृती सत्याची आहे. |
|
| 5 |
|
| त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत; परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. |
|
| 6 |
|
| परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. |
|
| 7 |
|
| तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करतो; महासागराचे निधी साठवतो. |
|
| 8 |
|
| अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो; जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. |
|
| 9 |
|
| कारण तो बोलला आणि अवघे झाले; त्याने आज्ञा केली आणि सर्वकाही स्थिर झाले. |
|
| 10 |
|
| राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो. |
|
| 11 |
|
| परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. |
|
| 12 |
|
| ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य! |
|
| 13 |
|
| परमेश्वर आकाशातून पाहतो; सर्व मानवजातीला तो निरखतो. |
|
| 14 |
|
| तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणार्या सर्वांना न्याहाळून पाहतो. |
|
| 15 |
|
| त्या सर्वांची हृदये घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. |
|
| 16 |
|
| कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही; वीरपुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. |
|
| 17 |
|
| जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय; त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही. |
|
| 18 |
|
| पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात, |
|
| 19 |
|
| त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. |
|
| 20 |
|
| आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे; आमचे साहाय्य व ढाल तोच आहे. |
|
| 21 |
|
| त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. |
|
| 22 |
|
| हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे. म्हणून आमच्यावर तुझी कृपादृष्टी असो. |
|
|
|
|