पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| दुष्टांच्या पापांबद्दल माझ्या हृदयात याहवेहचा संदेश आहे. त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते. |
| 2 |
| ते स्वतःच्या नजरेत अशी आत्मस्तुती करतात की, त्यांना आपला दोष दिसत नाही व ते आपल्या पापाचा द्वेष करीतच नाहीत. |
| 3 |
| त्यांचा प्रत्येक शब्द कपटाचा आणि अनीतीचा असतो; शहाणपणा आणि चांगुलपणा करण्यात ते अपयशी होतात. |
| 4 |
| ते दुष्ट योजनांचे कट रचीत रात्रभर जागे राहतात, ते स्वतःला पापी मार्गासाठी समर्पित करतात, आणि जे चुकीचे आहे ते नाकारत नाहीत. |
| 5 |
| याहवेह तुमची प्रीती स्वर्गापर्यंत, व तुमची सत्यता आकाशापर्यंत पोहोचली आहे. |
| 6 |
| तुमचे नीतिमत्व विशाल पर्वतासारखे आहे, तुमचे न्याय अथांग खोलीसारखे आहेत. याहवेह, तुम्ही मनुष्य आणि प्राण्यांची जोपासना करता. |
| 7 |
| हे परमेश्वरा, तुमची अक्षय प्रीती किती अमूल्य आहे! सर्व मानवजात तुमच्या पंखांच्या छायेत आश्रय घेते. |
| 8 |
| तुमच्या भवनातील विपुलतेतून तुम्ही त्यांना तृप्त करता; आपल्या आनंदाच्या नद्यांचे पाणी तुम्ही त्यांना पाजता. |
| 9 |
| कारण जीवनाचा झरा तुमच्याजवळ आहे; तुमच्या प्रकाशानेच आम्हाला प्रकाश मिळतो. |
| 10 |
| जे तुम्हाला ओळखतात त्यांच्यावर तुमची प्रीती, व जे सरळ अंतःकरणाचे त्यांच्यावर तुमचे नीतिमत्व असू द्या. |
| 11 |
| त्या गर्विष्ठ लोकांनी मला पायदळी तुडवू नये, दुष्टांचे हात मला बाहेर ढकलून देऊ नये. |
| 12 |
| पाहा, दुष्कर्म करणारे कसे खाली पडले आहेत— खाली फेकलेले, आता पुन्हा उठू शकणार नाहीत! |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/036.mp3
150
36