|
| 1 |
|
| याहवेह, तुम्ही क्रोधाने मला शासन करू नका. संतापून मला दंड करू नका. |
|
| 2 |
|
| तुमचे बाण माझ्या शरीरात खोल रुतले आहेत; तुमचे हात माझ्यावर जड झाले आहेत. |
|
| 3 |
|
| तुमच्या संतापामुळे माझे शरीर रोगजर्जर झाले आहे; माझ्या पातकांमुळे माझ्या हाडांमध्ये स्वस्थता नाही. |
|
| 4 |
|
| माझे दोष इतके भारी आहेत की ते वाहून नेणे अशक्य आहे. |
|
| 5 |
|
| माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा सडून त्यास दुर्गंधी सुटली आहे. |
|
| 6 |
|
| मी वाकून गेलो आणि वेदनेने त्रस्त झालो आहे; मी दिवसभर शोक करीत असतो. |
|
| 7 |
|
| माझ्या पाठीचा दाह होत आहे; माझ्या अंगी अजिबात आरोग्य राहिलेले नाही. |
|
| 8 |
|
| मी पार गळून व चिरडून गेलो आहे; माझ्या हृदयाच्या वेदनेने मी कण्हत आहे. |
|
| 9 |
|
| प्रभू माझी तीव्र इच्छा काय आहे, हे तुम्ही जाणता; माझा प्रत्येक उसासा तुम्ही ऐकता. |
|
| 10 |
|
| माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती म्लान होत आहे; मी आंधळा होत आहे असे मला वाटते. |
|
| 11 |
|
| माझे प्रियजन आणि माझे मित्र माझ्या आजारामुळे मजपासून दूर राहतात; माझे कुटुंबीय माझ्यापासून दूर उभे राहतात. |
|
| 12 |
|
| माझा जीव घेऊ पाहणारे त्यांचे जाळे रचतात, मला इजा करणारे माझ्या नाशाबद्दल बोलतात; ते दिवसभर फसवणूक आणि लबाडी करतात. |
|
| 13 |
|
| परंतु मी ऐकू न येणार्या बहिर्यासारखा झालो आहे; बोलता न येणार्या मुक्या माणसासारखा मी झालो आहे. |
|
| 14 |
|
| ज्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, अशा माणसासारखा मी आहे. |
|
| 15 |
|
| याहवेह, मी माझी भिस्त तुमच्यावर ठेवली आहे; प्रभू माझ्या परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्या. |
|
| 16 |
|
| कारण मी म्हटले, “माझे पाऊल घसरले, तेव्हा मजपुढे प्रौढी मिरविणार्यांना आनंद मिळू देऊ नका.” |
|
| 17 |
|
| कारण मी कोसळण्याच्या बेतात आहे आणि माझे दुःख सतत मजबरोबर आहे. |
|
| 18 |
|
| मी माझी पातके पदरी घेतो; माझ्या पापामुळे मी दुःखी आहे. |
|
| 19 |
|
| अनेक लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत; विनाकारण माझा द्वेष करणारे अनेक आहेत. |
|
| 20 |
|
| माझ्या चांगुलपणाची फेड ते दुष्टाईने करीत आहेत आणि मी सत्याच्या बाजूने उभे राहिलो, तरीही ते माझा द्वेष करीत आहेत. |
|
| 21 |
|
| याहवेह, मला सोडू नका; परमेश्वरा, मजपासून दूर जाऊ नका. |
|
| 22 |
|
| माझे प्रभू, माझे तारणारे, लवकर या आणि त्वरेने मला साहाय्य करा. |
|
|
|
|