पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| मी स्वतःशी म्हणालो, “मी आपले आचरण जपणार आणि माझी जीभ पापापासून जपणार; अनीतिमान लोक माझ्याभोवती असतील, तेव्हा मी माझ्या मुखाला मुसक्या बांधीन.” |
| 2 |
| म्हणून मी काही चांगलेही बोललो नाही, अगदी शांत राहिलो. पण माझा त्रास वाढतच गेला; |
| 3 |
| माझ्या अंतःकरणातील घालमेल अधिकच वाढत गेली, मी मनन करत असताना, माझ्या अंतःकरणातील अग्नी तप्त होत होता; तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो: |
| 4 |
| याहवेह, माझ्या जीवनाचा अंत मला दाखवा आणि माझे किती दिवस बाकी आहेत हे मला दाखवून द्या; माझे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते मला कळू द्या. |
| 5 |
| पाहा, तुम्ही माझे दिवस चार बोटे केले आहे; माझा जीवितकाल तुमच्या दृष्टीने केवळ एका क्षणाचाच आहे; प्रत्येकजण, अगदी निश्चिंत असणारे लोकसुद्धा केवळ एक श्वास आहेत. |
| 6 |
| निश्चितच प्रत्येकजण खरोखर सावलीप्रमाणेच जगतो; संपत्ती गोळा करण्याची त्याची सर्व धावपळ ही निरर्थकच, याचा उपभोग कोण घेईल हे त्याला ठाऊक नाही. |
| 7 |
| तर प्रभू, मी आता कोणत्या गोष्टींची प्रतीक्षा करू? माझी सर्व आशा तुमच्या ठायी आहे. |
| 8 |
| माझ्या पातकांपासून माझे रक्षण करा; मला मूर्खांच्या थट्टेचा विषय होऊ देऊ नका. |
| 9 |
| मी शांत राहिलो; मी माझे तोंड उघडले नाही, कारण तुम्हीच हे केले आहे. |
| 10 |
| तुमचा चाबूक माझ्यापासून दूर करा; तुमच्या हाताच्या प्रहाराने मी म्लान झालो आहे. |
| 11 |
| तुम्ही मनुष्याला त्याच्या पापाबद्दल फटके मारून शिस्त लावता, त्याचे ऐश्वर्य कसर लागलेल्या वस्त्रांप्रमाणे निकृष्ट करता; निश्चितच मनुष्य खरोखर केवळ श्वासमात्र आहे. |
| 12 |
| “याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची आरोळी ऐका; माझ्या अश्रूंकडे दुर्लक्ष करू नका. माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे या पृथ्वीवर प्रवास करणारा मी एक परदेशीय आणि वाटसरू आहे. |
| 13 |
| मी जाण्यापूर्वी, माझ्यावरची तुमची कडक नजर मजपासून फिरवा. जेणेकरून मी थोड्या काळासाठीच जीवनाचे सुख पुन्हा प्राप्त करू शकेन.” |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/039.mp3
150
39