पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत; संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात. |
| 2 |
| पृथ्वी उलथीपालथी झाली आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले, |
| 3 |
| सागरांच्या जलांनी गर्जना केल्या, आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. |
| 4 |
| आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते; तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात. |
| 5 |
| परमेश्वर स्वतः त्या नगरीत राहतात; ती नगरी अढळ राहील; प्रभात होताच परमेश्वर साहाय्य करतील. |
| 6 |
| राष्ट्रे खवळली, राज्ये कोलमडली; त्यांच्या मोठ्या गर्जनेने पृथ्वी विरघळून जाते. |
| 7 |
| सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत; याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. |
| 8 |
| या आणि आमचे याहवेह करीत असलेली अद्भुत कृत्ये पाहा; त्यांनी पृथ्वीचा नाश कसा केला आहे. |
| 9 |
| दिगंतापर्यंत युद्धे ते बंद करतात. ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात; ते रथांना अग्नीत भस्म करतात. |
| 10 |
| ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.” |
| 11 |
| सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत; याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/046.mp3
150
46