मराठी बायबल 2006
|
| 1 |
| लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा. |
| 2 |
| सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे. तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे. |
| 3 |
| त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली. त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले. |
| 4 |
| देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली. त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला. |
| 5 |
| परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात आपल्या सिंहासानाकडे जातो. |
| 6 |
| देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा. |
| 7 |
| देव सर्व जगाचा राजा आहे. त्याच्या स्तुतिपर गाणे गा. |
| 8 |
| देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्या देशांवर राज्य करतो. |
| 9 |
| देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात. सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत. देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/047.mp3
150
47