पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| अहो सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा; उत्साहपूर्ण शब्दांनी परमेश्वराचा जयजयकार करा. |
| 2 |
| कारण सर्वोच्च याहवेह भयप्रद आहेत; ते अखिल पृथ्वीचे सार्वभौम राजा आहेत. |
| 3 |
| त्यांनीच लोकांना आमच्या सत्तेखाली आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणले. |
| 4 |
| ते आमच्यासाठी आमचे वतन निवडतात, हेच याकोबाचे वैभव आहे, ज्यांच्यावर त्यांनी प्रीती केली. |
| 5 |
| प्रचंड जयघोष होत असताना, परमेश्वर वर गेले आहेत, तुतार्यांचे मोठे निनाद होत असताना, याहवेह वर गेले आहेत. |
| 6 |
| परमेश्वराची स्तुती गा, स्तुती गा; आमच्या राजाची स्तुती गा, स्तुती गा. |
| 7 |
| कारण परमेश्वर अखिल पृथ्वीचे राजाधिराज आहेत; त्यांच्याप्रीत्यर्थ स्तुतिस्तोत्रे गा. |
| 8 |
| परमेश्वर सर्व राष्ट्रांवर सत्ता गाजवितात; परमेश्वर आपल्या पवित्र सिंहासनावर विराजमान आहेत. |
| 9 |
| जगातील लोकांचे अधिपती, अब्राहामाच्या परमेश्वराचे लोक म्हणून एकत्र जमले आहेत; पृथ्वीवरील राजे वास्तविक परमेश्वराचेच आहेत, ते अत्यंत थोर आहेत. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/047.mp3
150
47