पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| कोरहाच्या मुलांचे संगीतस्तोत्र. परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. |
| 2 |
| उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. |
| 3 |
| देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे. |
| 4 |
| कारण पाहा, राजे एकत्र झाले व एकजुटीने चढाई करून आले. |
| 5 |
| हे नगर पाहताच ते विस्मित झाले, व घाबरे होऊन पळत सुटले. |
| 6 |
| तेथे त्यांना कंप सुटला; त्यांना प्रसूतिवेदनांप्रमाणे वेदना झाल्या |
| 7 |
| पूर्वेच्या वार्याने तार्शीशची गलबते तू फोडतोस. |
| 8 |
| जे आम्ही ऐकले ते सेनाधीश परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात पाहिले; ते हे की, देव सर्वकाळ ते स्थिर राखील. (सेला) |
| 9 |
| हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले. |
| 10 |
| हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे; तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे; |
| 11 |
| तुझ्या न्यायकृत्यांमुळे सीयोन डोंगर आनंद पावो; यहूदाच्या कन्या उल्लासोत. |
| 12 |
| सीयोनेसभोवती फिरा, तिला फेरा घाला; तिचे बुरूज मोजा; |
| 13 |
| तिच्या कोटांकडे लक्ष द्या, तिच्या प्रासादांमधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हांला सांगता येईल. |
| 14 |
| कारण हा देव आमचा सनातन देव आहे; तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/048.mp3
150
48