पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत. |
| 2 |
| त्यांचे शिखर मनोहर आहेत, ज्यात संपूर्ण पृथ्वी आनंदित आहे, सीयोन पर्वत उत्तरेकडील झाफोन पर्वतासारखेच उंच आहे, जे राजाधिराजाची नगरी आहे. |
| 3 |
| परमेश्वराने स्वतःला तिच्या राजमहालांमध्ये उंच आश्रयदुर्ग असे तिला प्रकट केले आहे. |
| 4 |
| ज्यावेळी राजांनी आपली सैन्ये एकवटली, ज्यावेळी ते एकत्र होऊन आगेकूच करीत आले. |
| 5 |
| त्यांनी हिला पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले; भयभीत होऊन त्यांनी पळ काढला. |
| 6 |
| त्या ठिकाणी त्यांना कापरे भरले; स्त्रीला होणार्या प्रसूतीच्या वेदनांसारख्या वेदना त्यांना होऊ लागल्या. |
| 7 |
| पूर्वेकडील वार्याने तार्शीशच्या गलबतांच्या नष्ट व्हाव्यात, त्याप्रमाणे तुम्ही त्यांचा नाश केला. |
| 8 |
| आम्ही जे ऐकले होते, आणि आम्ही जे प्रत्यक्ष पहिले आहे सर्वशक्तिमान याहवेहच्या नगरात, आमच्या परमेश्वराच्या नगरात: परमेश्वर सर्वकाळासाठी तिला स्थिर करतील. |
| 9 |
| परमेश्वरा, तुमच्या मंदिरात, आम्ही तुमच्या प्रेमदयेचे चिंतन करतो. |
| 10 |
| हे परमेश्वरा, तुमच्या नावाप्रमाणे, तुमची स्तुती देखील पृथ्वीवर सर्वत्र पसरली आहे. तुमचा उजवा हात नीतिमत्तेने परिपूर्ण आहे. |
| 11 |
| तुमच्या न्यायकृत्यांमुळे सीयोन पर्वत आनंद करो; यहूदाहची नगरे हर्ष करोत. |
| 12 |
| सीयोनेभोवती फिरा, तिची फेरी मारा, तिचे बुरूज मोजा. |
| 13 |
| तिची तटबंदी पाहा आणि तिच्यातील राजवाडे न्याहाळून पाहा, म्हणजे तुम्हाला तिचे वर्णन करून तुमच्या पुढील पिढीला सांगता येईल. |
| 14 |
| कारण हेच आमचे सनातन परमेश्वर आहेत; ते अखेरपर्यंत आमचे मार्गदर्शक राहतील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/048.mp3
150
48