पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| हे बलवान पुरुषा, दुष्ट कृत्यांची बढाई का मारतोस, तू दिवसभर कशाचा अभिमान बाळगतोस, तू जो परमेश्वराच्या दृष्टीने निंदनीय आहेस? |
| 2 |
| तू जो फसव्या कृतीत गुंतलेला आहे, दिवसभर तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्यासारखी विनाशाची योजना करीत असते. |
| 3 |
| तुला चांगल्यापेक्षा दुष्टपणा, सत्य बोलण्यापेक्षा असत्य अधिक प्रिय आहे. |
| 4 |
| अगे कपटी जिभे, अपायकारक बोलणे तुला प्रिय आहे! |
| 5 |
| परंतु परमेश्वर तुला शाश्वत विनाशाकडे आणतील; तुझ्या डेर्यातून तुला ओढून बाहेर काढतील आणि जिवंतांच्या भूमीतून समूळ नष्ट करून तुला दूर नेतील. |
| 6 |
| नीतिमान लोक भयचकित होऊन पाहतील; ते त्याला हसतील व म्हणतील: |
| 7 |
| “पाहा, हा असा मनुष्य आहे ज्याने परमेश्वराला आपले आश्रयस्थान बनविले नाही तर आपल्या विपुल संपत्तीवर विश्वास ठेवला आणि दुसर्यांचा नाश करून तो बलवान झाला!” |
| 8 |
| परंतु मी तर परमेश्वराच्या आश्रयाखालील जैतून वृक्षाप्रमाणे सुरक्षित आहे; परमेश्वराच्या अक्षय प्रीतिवर मी सदासर्वकाळ विसंबून आहे. |
| 9 |
| कारण तुम्ही जे काही केले त्याबद्दल तुमच्या विश्वासू लोकांसमक्ष मी सदासर्वकाळ तुमची स्तुती करेन. आणि मी तुमच्या नावाची आशा करेन, कारण तुमचे नाव चांगले आहे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/052.mp3
150
52