पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर अस्तित्वात नाही.” ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी, कारण सत्कर्म करणारा कोणी नाही. |
| 2 |
| मानवांमध्ये कोणी समंजस आहे का परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का हे पाहण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतात. |
| 3 |
| प्रत्येकजण भटकून गेलेला आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही. |
| 4 |
| दुष्कृत्य करणार्यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून टाकतील. ते कधीही परमेश्वराला हाक मारत नाहीत. |
| 5 |
| पण पाहा, जिथे भिण्याचे कारण नव्हते, तिथे ते भयाने भरले. परमेश्वराने त्यांची हाडे विखरून टाकली, ज्यांनी तुमच्याविरुद्ध तळ दिला होता; तुम्ही त्यांची फजिती केली, कारण ते परमेश्वराद्वारे लज्जित झाले आहेत. |
| 6 |
| अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा परमेश्वर त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो! |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/053.mp3
150
53