मराठी बायबल 2006
|
| 1 |
| देवा, तुझ्या अधिकाराचा उपयोग करुन मला वाचव. तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर. |
| 2 |
| देवा, माझी प्रार्थना ऐक मी काय म्हणतो ते ऐक. |
| 3 |
| जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुध्द गेले आहेत आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहेत. |
| 4 |
| पाहा, माझा देव मला मदत करेल. माझा मालक मला साहाय्य करेल. |
| 5 |
| जे लोक माझ्याविरुध्द गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल. देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल. |
| 6 |
| देवा, मी तुला खुशीने अर्पणे देईन. परमेश्वरा, मी तुझ्या चांगल्या नावाची स्तुती करेन. |
| 7 |
| परंतु मी तुला सर्व संकटांतून सोडवण्याची विनंती करीत आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झाल्याचे मला पाहू दे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/054.mp3
150
54