पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| हे परमेश्वरा, मजवर दया करा, कारण शत्रू त्वेषाने माझा पाठलाग करीत आहे; दिवसभर निकराने ते माझ्यावर हल्ले करीतच असतात. |
| 2 |
| माझे शत्रू दिवसभर माझा पाठलाग करीत आहेत; माझ्यावर गर्वाने प्रहार करणारे अनेकजण आहेत. |
| 3 |
| परंतु ज्यावेळी मला भय वाटेल, त्यावेळी मी तुमच्यावर भरवसा टाकेन. |
| 4 |
| परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन. मी परमेश्वरावर विसंबून आहे आणि मी भिणार नाही. मर्त्य मानव माझे काय करणार? |
| 5 |
| दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरीत अर्थ काढतात; माझा पाडाव कसा करावा, यासंबंधीचाच ते विचार करीत असतात. |
| 6 |
| ते एकत्र जमून कट रचतात, दबा धरतात; माझ्या पावलांचा कानोसा घेत, मला ठार करण्याच्या संधीची वाट पाहतात. |
| 7 |
| त्यांच्या दुष्टतेमुळे त्यांना निसटून जाऊ देऊ नका; परमेश्वरा, आपल्या संतापाने त्या राष्ट्रांना पाडून टाका. |
| 8 |
| तुम्ही माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत; तुम्ही माझे अश्रू तुमच्या कुपीमध्ये ठेवले आहेत; तुमच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत त्यांची नोंद नाही काय? |
| 9 |
| ज्यावेळेस मी तुमचा मदतीसाठी धावा करेन. माझे शत्रू मागे फिरून पळ काढतील; त्यावरून हे प्रमाणित होणार की परमेश्वर माझ्या पक्षाचे आहेत. |
| 10 |
| परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन, याहवेहमध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन— |
| 11 |
| मी परमेश्वरावरच आपला भरवसा ठेवणार आणि मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार? |
| 12 |
| माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला नवस केला आहे; मी तुम्हाला उपकारस्तुतीची अर्पणे करेन. |
| 13 |
| कारण तुम्ही माझा जीव मृत्यूपासून सोडविला आहे आणि माझे पाय घसरण्यापासून सावरले आहेत; जेणेकरून मला परमेश्वरासमोर जीवनाच्या प्रकाशात चालता यावे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/056.mp3
150
56