पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मुख्य गवयासाठी; अल्तश्केथ (नष्ट करू नको) ह्या चालीवर गायचे; दावीद शौलापासून पळून गुहेत गेला तेव्हा त्याने रचलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र. हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर; माझा जीव तुझा आश्रय करतो; ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन. |
| 2 |
| परात्पर देवाचा, माझे सर्वकाही सिद्धीस नेणार्या देवाचा मी धावा करीन. |
| 3 |
| तो स्वर्गातून साहाय्य पाठवून मला तारील; कारण माझा पिच्छा पुरवणारा माझा उपहास करीत आहे; (सेला) देव आपली दया व सत्य पाठवून देईल. |
| 4 |
| माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे; ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्येदेखील मी पडून राहीन. |
| 5 |
| हे देवा, आकाशांहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीवर होवो. |
| 6 |
| माझ्या पायांसाठी त्यांनी जाळे मांडले आहे; माझा जीव गळून गेला आहे; माझ्या वाटेत त्यांनी खाच खणली, तिच्यात ते स्वतःच पडले आहेत. (सेला) |
| 7 |
| हे देवा, माझे अंतःकरण स्थिर आहे माझे अंतःकरण स्थिर आहे; मी गाईन, मी स्तोत्रे गाईन. |
| 8 |
| हे माझ्या जिवा, जागृत हो, हे सतारी, हे वीणे, जागृत व्हा; मी प्रभातेला जागे करीन. |
| 9 |
| हे प्रभू, लोकांमध्ये मी तुझे उपकारस्मरण करीन, राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन; |
| 10 |
| कारण तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे. |
| 11 |
| हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीभर होवो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/057.mp3
150
57