पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मुख्य गवयासाठी; तंतुवाद्यांच्या साथीने आठव्या मंद्र स्वरावर गायचे दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस; संतापून मला शिक्षा करू नकोस. |
| 2 |
| हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर; माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा, मला बरे कर. |
| 3 |
| माझा जीव अगदी घाबरा झाला आहे; हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? |
| 4 |
| हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव, तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार; |
| 5 |
| कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही; अधोलोकात तुझे उपकारस्मरण कोण करणार? |
| 6 |
| मी कण्हून कण्हून थकलो आहे, रोज रात्री मी आपले अंथरूण आसवांत पोहवतो; मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवतो. |
| 7 |
| शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे; माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत. |
| 8 |
| अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. |
| 9 |
| परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे; परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करील. |
| 10 |
| माझे सर्व वैरी फजीत होतील व फार घाबरतील; ते माघारी फिरतील, एकाएकी लज्जित होतील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/006.mp3
150
6