पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेह, रागाने माझा निषेध करू नका, तीव्र क्रोधाने मला शासन करू नका. |
| 2 |
| मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे; मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत. |
| 3 |
| माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे. याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार? |
| 4 |
| याहवेह, परत येऊन मला सोडवा; तुमच्या दयेनुसार मला वाचवा. |
| 5 |
| मृतलोकात तुमचे स्मरण नाही; गर्तेमध्ये तुमचे उपकारस्मरण कोण करणार? |
| 6 |
| माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो. |
| 7 |
| दुःखाने माझे डोळे निस्तेज झाले आहेत; माझ्या शत्रूंमुळे माझी दृष्टी क्षीण झाली आहे. |
| 8 |
| दुष्टाई करणार्यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे. |
| 9 |
| याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे; याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील. |
| 10 |
| माझे सर्व शत्रू भय आणि लज्जा पावतील; ते मागे फिरतील आणि तत्काळ लज्जित होतील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/006.mp3
150
6