पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मुख्य गवयासाठी; शूशन एदूथ (साक्षीचे भूकमल) ह्या चालीवर शिक्षणासाठी गायचे मिक्ताम नावाचे दाविदाचे स्तोत्र. तो अराम-नहराईम व अराम-सोबा ह्यांच्याशी लढाई करीत असता यवाबाने परत जाऊन क्षाराच्या खोर्यात अदोमातले बारा हजार पुरुष मारले तेव्हा रचलेले. हे देवा, तू आमचा त्याग केला आहेस, आमची दाणादाण केली आहेस; तू कोपायमान झाला आहेस; तू आम्हांला पूर्वस्थितीवर आण. |
| 2 |
| तू भूमी कंपित केली आहेस, ती विदारली आहे; तिची भगदाडे भरून काढ, कारण ती डळमळत आहे. |
| 3 |
| तू आपल्या लोकांना कठीण प्रसंग दाखवला आहेस; तू आम्हांला जणू काय झोकांड्या खाण्यास लावणारा द्राक्षारस पाजला आहेस; |
| 4 |
| तुझे भय बाळगणार्यांना तू ध्वज दिला आहेस; अशासाठी की, तो त्यांनी सत्यासाठी फडकवावा. (सेला) |
| 5 |
| तुझ्या प्रिय जनांनी मुक्त व्हावे, म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे ऐक. |
| 6 |
| देव आपल्या पवित्रतेला अनुसरून1 म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन; |
| 7 |
| गिलाद माझा आहे व मनश्शे माझा आहे, एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझे राजवेत्र आहे; |
| 8 |
| मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे; अदोमावर मी आपले पायतण फेकीन; हे पलेशेथा, माझ्यामुळे तू आरोळी मार.” |
| 9 |
| मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल? अदोमात मला कोण नेईल? |
| 10 |
| हे देवा, तू आमचा त्याग केलास ना? हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस. |
| 11 |
| शत्रूपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे साहाय्य केवळ व्यर्थ आहे. |
| 12 |
| देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/060.mp3
150
60