पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मुख्य गवयासाठी; तंतुवाद्याच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र. हे देवा, माझा धावा ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. |
| 2 |
| माझे मन व्याकूळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो; जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने. |
| 3 |
| कारण तू माझा आश्रय, वैर्यापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस. |
| 4 |
| तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय घेईन. (सेला) |
| 5 |
| कारण, हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; तुझ्या नावाचे भय धरणार्यांचे वतन तू मला दिले आहेस; |
| 6 |
| तू राजाला दीर्घायू कर; त्याच्या आयुष्याची वर्षें कैक पिढ्यांच्या वर्षांइतकी होवोत. |
| 7 |
| तो देवासमोर चिरकाल राहो; तुझे वात्सल्य व सत्य त्याचे रक्षण करतील असे कर; |
| 8 |
| म्हणजे तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडत राहीन. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/061.mp3
150
61