पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे देवा, माझी काकुळतीची वाणी ऐक; वैर्याच्या भयापासून माझ्या जिवाचे रक्षण कर. |
| 2 |
| दुष्टांच्या कटापासून, दुष्कर्म्यांच्या गुप्त मसलतीपासून मला लपव. |
| 3 |
| त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी पाजळली आहे; सात्त्विकाला एकान्तात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटु शब्दांचा नेम धरला आहे. |
| 4 |
| ते त्याच्यावर अकस्मात मारा करतात; ते भीत नाहीत. |
| 5 |
| ते आपला दुष्ट संकल्प दृढ करतात; पाश गुप्तपणे मांडण्याविषयी ते कुजबुज करतात; “आम्हांला कोण पाहणार?” असे ते म्हणतात. |
| 6 |
| ते कुटिल युक्त्या शोधून काढतात; ते म्हणतात, “आपण चतुराईने युक्ती शोधून काढली आहे;” प्रत्येकाचे अंतर्याम व हृदय खोल आहे, |
| 7 |
| तरी देव त्यांच्यावर तीर सोडील; ते अकस्मात घायाळ होतील. |
| 8 |
| त्यांचीच जीभ त्यांना प्रतिकूल होऊन ते अडखळून पडतील; त्यांना पाहणारे सर्व जण डोके हलवतील. |
| 9 |
| तेव्हा मानवजातीस धाक बसेल; ते देवाची कृती वाखाणतील व त्याच्या कृतीचा नीट विचार करतील. |
| 10 |
| परमेश्वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील; सरळ अंतःकरणाचे सर्व जन उल्लास पावतील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/064.mp3
150
64