पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| हे परमेश्वरा, तुमची स्तुती सीयोनेत अपेक्षित आहे; तुम्हाला केलेला नवस तिथे पूर्ण करण्यात येईल. |
| 2 |
| तुम्हीच प्रार्थनेचे उत्तर देता, म्हणून तुमच्याकडे सर्व लोक येतील. |
| 3 |
| आमची अंतःकरणे पापांनी भरलेली असली, तरी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली. |
| 4 |
| तुमच्या अंगणात येऊन राहण्यासाठी तुम्ही ज्यांची निवड केली, ते धन्य! आम्ही तुमच्या मंदिरातील पवित्रस्थानाच्या उत्कृष्ट पदार्थांनी संतुष्ट होऊ. |
| 5 |
| तुमच्या अद्भुत आणि नीतिकार्याद्वारे तुम्ही आम्हाला प्रत्युत्तर देता, परमेश्वर, आमचे तारणकर्ता, पृथ्वीच्या टोकापर्यंत आणि दुर्गम समुद्रापर्यंत, तुम्ही सर्व भक्तांची आशा आहात. |
| 6 |
| आपल्या महान शक्तीने त्यांनी पर्वतांना त्यांच्या ठिकाणी स्थिर ठेवले आहे. |
| 7 |
| तुम्ही महासागराच्या खवळलेल्या लाटांना शांत करता आणि सर्व राष्ट्रांचे कोलाहल शांत करता. |
| 8 |
| संपूर्ण पृथ्वी तुमच्या महाकृत्याने विस्मित होते; सूर्योदय आणि सूर्यास्त ही आनंदाने जयघोष करीत आहेत. |
| 9 |
| तुम्ही या भूमीची काळजी घेता व ती सिंचनासाठी देता. आपण ते विपुल व समृद्ध करता. लोकांना धान्य मिळावे म्हणून परमेश्वराच्या नद्या पाण्याने भरल्या आहेत, कारण तुम्ही ते निर्धारित केले आहे. |
| 10 |
| तुम्ही नांगरलेल्या सऱ्यांना पाणी देता आणि तुम्ही तिचे उंचवटे सपाट करता; पावसाच्या सरींनी तिला मऊ करता; तिच्या अंकुरांना आशीर्वाद देता. |
| 11 |
| तुम्ही तुमच्या औदार्यासह वर्षास शिरोभूषण चढविता आणि तुमच्या गाड्या समृद्धीने ओसांडत आहेत. |
| 12 |
| राने हिरव्यागार लुसलुशीत गवताने आच्छादून टाकता; टेकड्या आनंदाची वस्त्र परिधान करतात. |
| 13 |
| हिरवीगार कुरणे कळपांनी भरून जातात आणि दर्यांची भूमी धान्यांनी आच्छादली जाते; ती आनंदाने गजर करीत गाऊ लागते. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/065.mp3
150
65