|
| 1 |
|
| मुख्य गवयासाठी; संगीतस्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, देवाचा जयजयकार करा. |
|
| 2 |
|
| त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा. |
|
| 3 |
|
| देवाला म्हणा, “तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. |
|
| 4 |
|
| सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील; तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.” (सेला) |
|
| 5 |
|
| अहो या, देवाची कृत्ये पाहा; तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवतो. |
|
| 6 |
|
| त्याने समुद्राची कोरडी भूमी केली; ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्याच्या ठायी हर्ष पावलो. |
|
| 7 |
|
| तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ सत्ता चालवतो, त्याचे नेत्र राष्ट्रांना निरखून पाहतात; बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. (सेला) |
|
| 8 |
|
| अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा, त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा; |
|
| 9 |
|
| त्यानेच आमच्या प्राणाचे रक्षण केले, त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत. |
|
| 10 |
|
| कारण हे देवा, तू आम्हांला पारखले आहेस; रुपे गाळतात तसे तू आम्हांला गाळून पाहिले आहेस. |
|
| 11 |
|
| तू आम्हांला जाळ्यांत गुंतवले; तू आमच्या कंबरेला भारी ओझे बांधले. |
|
| 12 |
|
| तू मनुष्यांना आमच्या डोक्यांवरून स्वारी करायला लावले; आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हांला बाहेर काढून समृद्ध स्थळी आणलेस. |
|
| 13 |
|
| मी होमार्पणे घेऊन तुझ्या मंदिरात येईन, तुला केलेले नवस फेडीन; |
|
| 14 |
|
| संकटात असता ते मी आपल्या ओठांनी उच्चारले; मी ते आपल्या तोंडाने केले. |
|
| 15 |
|
| मेंढ्यांच्या धूपासहित पुष्ट पशूंचे होम मी तुला अर्पण करीन; बोकडांसह मी गोर्हे अर्पण करीन. (सेला) |
|
| 16 |
|
| अहो देवाचे भय धरणारे सर्व जनहो, तुम्ही या, ऐका; त्याने माझ्या जिवासाठी जे केले आहे ते मी सांगतो. |
|
| 17 |
|
| मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. |
|
| 18 |
|
| माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता; |
|
| 19 |
|
| पण देवाने ऐकलेच आहे; माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे. |
|
| 20 |
|
| देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही, त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही. |
|
|
|
|