|
| 1 |
|
| अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, आनंदाने परमेश्वराचा जयजयकार करा! |
|
| 2 |
|
| त्यांच्या गौरवशाली नावाचा महिमा गा; ते किती अद्भुत आहेत, हे जगाला सांगा. |
|
| 3 |
|
| परमेश्वराला म्हणा, “तुमची कृत्ये किती अद्भुत आहेत! तुमच्या सामर्थ्यामुळे तुमचे शत्रू तुम्हाला दबकतात. |
|
| 4 |
|
| पृथ्वीवरील सर्व लोक तुमच्यासमोर नतमस्तक होतील; ते तुमच्या गौरवांची गीते गातील, ते तुमच्या नावाच्या गौरवांची गीते गातील.” |
|
| 5 |
|
| या आणि पाहा, परमेश्वराने काय केले, त्यांनी लोकांच्या बाबतीत किती अद्भुत कृत्ये केली! |
|
| 6 |
|
| त्यांनी समुद्रात त्यांच्यासाठी कोरडी भूमी तयार केली; ते जलातून पायी पलीकडे गेले— यास्तव त्यांच्यामध्ये आपण हर्ष करू या. |
|
| 7 |
|
| आपल्या सामर्थ्याने ते सदासर्वकाळ राज्य करतात, प्रत्येक राष्ट्रांना ते न्याहाळून पाहतात— की बंडखोरांनी त्यांच्याविरुद्ध विद्रोह करू नये. |
|
| 8 |
|
| अहो सर्व लोकहो. परमेश्वराची स्तुती करा, त्यांची स्तुतिस्तोत्रे ऐकू येवो. |
|
| 9 |
|
| कारण आमचे जीवन त्यांच्या हाती आहे आणि ते आमची पावले घसरू देत नाही. |
|
| 10 |
|
| हे परमेश्वरा, तुम्ही आमची परीक्षा घेतली; चांदी शुद्ध करतात, तसे तुम्ही आम्हाला शुद्ध केले आहे. |
|
| 11 |
|
| तुम्ही आम्हाला कारागृहात आणले आणि आमच्या पाठीवर भारी ओझी लादली. |
|
| 12 |
|
| तुम्ही लोकांना आमची डोकी तुडवून जाऊ दिले; आम्ही अग्नी आणि प्रलय यामधून गेलो, परंतु तुम्ही आम्हाला बाहेर काढून समृद्ध भूमीवर आणले आहे. |
|
| 13 |
|
| मी तुमच्या मंदिरात होमार्पणे घेऊन, माझे नवस फेडण्यासाठी येणार आहे— |
|
| 14 |
|
| कारण मी संकटात होतो, तेव्हा माझ्या ओठांनी अभिवचन दिले आणि माझ्या मुखाने मी ते विदित केले. |
|
| 15 |
|
| म्हणूनच पुष्ट पशूंची तसेच मेंढ्याची होमार्पणे तुमच्याकडे आणेन; मी गोर्हे आणि बोकडांचे अर्पण करेन. |
|
| 16 |
|
| अहो तुम्ही, जे परमेश्वराचे भय बाळगता, ते या आणि ऐका; त्यांनी माझ्यासाठी काय काय केले ते सर्व मी तुम्हाला सांगेन. |
|
| 17 |
|
| साहाय्यासाठी मी मुखाने त्यांचा धावा केला; आणि माझ्या जिभेवर त्यांची स्तुती होती. |
|
| 18 |
|
| मी माझी पातके माझ्या अंतःकरणात ठेवली असती, तर परमेश्वराने माझा धावा ऐकला नसता; |
|
| 19 |
|
| परंतु परमेश्वराने ते ऐकले, त्यांनी माझ्या प्रार्थनेच्या विनंतीकडे लक्ष दिले आहे. |
|
| 20 |
|
| परमेश्वराचा धन्यवाद असो, त्यांनी माझी प्रार्थना अस्वीकार केली नाही, आणि माझ्यावर प्रीती करण्याचे नाकारले नाही. |
|
|
|
|