मराठी बायबल 2006
|
| 1 |
| देवा, माझा उध्दार कर. देवा लवकर ये आणि मला मदत कर. |
| 2 |
| लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा कर त्यांची मानखंडना कर. लोकांना माझ्या बाबतीत वाईटगोष्टी करायच्या आहेत ते पडावेत आणि त्यांना लाज वाटावी असी माझी इच्छा आहे. |
| 3 |
| लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी आणि त्यांना शरम वाटावी अशी मला आशा वाटते. |
| 4 |
| जे लोक तुझी उपासना करतात ते खूप खूप सुखी व्हावेत असे मला वाटते. ज्या लोकांना तुझी मदत हवी आहे त्या लोकांना नेहमी तुझी स्तुती करणे शक्य होईल अशी मला आशा वाटते. |
| 5 |
| मी गरीब आणि असहाय्य माणूस आहे. देवा, लवकर ये आणि मला वाचव. देवा, फक्त तूच माझी सुटका करु शकतोस. उशीर करु नकोस. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/070.mp3
150
70