पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्मरणार्थ स्तोत्र. हे देवा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर. |
| 2 |
| जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत. |
| 3 |
| मला “अहाहा! अहाहा!” असे चिडवणार्यांची फजिती होऊन ते लज्जेने मागे हटोत. |
| 4 |
| तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद व उल्लास पावोत; तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे “देवाचा महिमा वाढो,” असे सतत म्हणोत. |
| 5 |
| मी तर दीन व दरिद्री आहे. हे देवा, माझ्याकडे येण्याची त्वरा कर; माझा साहाय्यकर्ता व माझा मुक्तिदाता तू आहेस; हे परमेश्वरा, विलंब लावू नकोस. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/070.mp3
150
70