मराठी बायबल 2006
|
| 1 |
| देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात. |
| 2 |
| देव म्हणतो “मी न्यायदानाची वेळ निवडली, मी बरोबर न्याय करीन. |
| 3 |
| पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल आणि पडायला येईल पण मी त्याला स्थिरता देईन.” |
| 4 |
| 5 |
| 6 |
| या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल अशी कोणतीही शक्ती नाही. |
| 7 |
| देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो. देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो. देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही. |
| 8 |
| देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे. परमेश्वराच्या हातात पेला आहे. तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे. तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील. |
| 9 |
| मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन. मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन. |
| 10 |
| मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/075.mp3
150
75