पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मुख्य गवयासाठी; तंतुवाद्यांच्या साथीने गायचे आसाफाचे संगीतस्तोत्र. यहूदात देव प्रकट झाला आहे; इस्राएलात त्याचे नाव थोर आहे. |
| 2 |
| शालेमात त्याचा मंडप आहे; व सीयोनेत त्याचे निवासस्थान आहे. |
| 3 |
| तेथे धनुष्याचे बाण, ढाल, तरवार व युद्धसामग्री त्याने मोडून टाकली. (सेला) |
| 4 |
| तू प्रतापी आहेस, लुटीने भरलेल्या पर्वतावर तेजस्वी आहेस. |
| 5 |
| कणखर मनाच्या पुरुषांची लूटमार झाली आहे; ते झोपी गेले आहेत; त्यांतील कोणाही बलवानाचे हात चालेनात. |
| 6 |
| हे याकोबाच्या देवा, तुझ्या धमकीने रथ व घोडा ह्यांना गाढ निद्रा लागली आहे. |
| 7 |
| तुझे, केवळ तुझेच, भय धरले पाहिजे; तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील? |
| 8 |
| तू स्वर्गातून आपला निर्णय ऐकवला; तेव्हा पृथ्वी भ्याली व स्तब्ध झाली; |
| 9 |
| पृथ्वीवरील सर्व दीनांस तारण्यासाठी, न्यायनिवाडा करण्यासाठी देव उठला, तेव्हा असे झाले. (सेला) |
| 10 |
| कारण मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो; अवशिष्ट क्रोधाने तू आपली कंबर बांधतोस. |
| 11 |
| परमेश्वर तुमचा देव ह्याला नवस करा व ते फेडा; ज्याचे भय धरले पाहिजे त्याला त्याच्या सभोवतालच्या सर्वांनी नजराणे आणावेत. |
| 12 |
| अधिपतींची हिंमत तो नष्ट करतो; पृथ्वीवरील राजांना तो भयप्रद आहे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/076.mp3
150
76