पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| परमेश्वर यहूदीयात प्रसिद्ध आहेत; इस्राएलमध्ये त्यांचे नाव थोर आहे. |
| 2 |
| त्यांचा मंडप शालेम येथे आहे, त्यांचे निवासस्थान सीयोन येथे आहे. |
| 3 |
| तिथे त्यांनी चमकणारे बाण, ढाली आणि तलवारी, युद्धाची शस्त्रे मोडली. |
| 4 |
| तुम्ही प्रकाशाने तेजस्वी आहात, प्राण्यांनी समृद्ध असलेल्या पर्वतांपेक्षा अधिक वैभवी. |
| 5 |
| प्रबळांची लूटमार झाली आहे, ते मृत्यूची निद्रा घेत आहेत; त्यांच्यातील एकाही योद्ध्याला हात उचलता येत नाही. |
| 6 |
| हे याकोबाच्या परमेश्वरा, तुम्ही फटकारल्यावर घोडे आणि स्वार गाढ झोपेत गेले आहेत. |
| 7 |
| तुम्हीच एकटेच भयास योग्य आहात. जेव्हा आपण रागावता, तेव्हा आपल्यासमोर कोण उभा राहू शकतो? |
| 8 |
| स्वर्गातून तुम्ही आपला निर्णय जाहीर केला, तेव्हा पृथ्वीचा थरकाप उडाला आणि ती स्तब्ध झाली— |
| 9 |
| पृथ्वीवरील पीडितांचे रक्षण करण्यासाठी, परमेश्वर उठून उभे राहिले तेव्हा असे झाले. |
| 10 |
| खचित तुमचा मनुष्यावरचा क्रोध तुमच्या स्तुतीस कारणीभूत होईल, आणि तुमच्या रोषाने उर्वरितांना रोखण्यात आले. |
| 11 |
| तुमचे परमेश्वर याहवेह यांना केलेले सर्व नवस तुम्ही फेडा; शेजारच्या प्रत्येक राष्ट्राने त्यांच्यासाठी भेटी आणाव्यात; त्यांच्याबद्दल आदर आणि भीती बाळगावी. |
| 12 |
| कारण ते अधिपतींचा अभिमान नष्ट करतील; पृथ्वीवरील राजांकरिता ते भयावह आहेत. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/076.mp3
150
76