|
| 1 |
|
| मुख्य गवयासाठी; यदूथूनाच्या पद्धतीप्रमाणे आसाफाचे स्तोत्र. मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन. |
|
| 2 |
|
| माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो; रात्री माझा हात पसरलेला राहिला, तो ढिला पडला नाही; माझा जीव सांत्वन पावेना. |
|
| 3 |
|
| मी देवाचे स्मरण करून व्याकूळ होतो; मी ध्यान करू इच्छितो पण माझा जीव मूर्च्छित होतो. (सेला) |
|
| 4 |
|
| तू माझ्या पापणीस पापणी लागू देत नाहीस; मी विव्हळ झालो आहे, मला बोलवत नाही. |
|
| 5 |
|
| पूर्वीचे दिवस व प्राचीन काळची वर्षे ही मी ध्यानात आणली आहेत. |
|
| 6 |
|
| रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते; मी आपल्या मनात चिंतन करतो; माझा जीव विचारात पडला आहे की, |
|
| 7 |
|
| “प्रभू सर्वकाळ आमचा त्याग करील काय? तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय? |
|
| 8 |
|
| त्याची दया कायमची नाहीशी झाली काय? त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय? |
|
| 9 |
|
| देव कृपा करायचे विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय?” (सेला) |
|
| 10 |
|
| “परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे”1 असे वाटून मला दु:ख झाले. |
|
| 11 |
|
| मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन करीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन. |
|
| 12 |
|
| मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन. |
|
| 13 |
|
| हे देवा, तुझा मार्ग पवित्र2 आहे; देवासारखा थोर देव कोण आहे? |
|
| 14 |
|
| अद्भुत कृत्ये करणारा तूच देव आहेस; तू आपले सामर्थ्य लोकांत प्रकट केले आहेस. |
|
| 15 |
|
| याकोब व योसेफ ह्यांची संतती म्हणजे तुझे लोक, ह्यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहेस. (सेला) |
|
| 16 |
|
| जलांनी तुला पाहिले, हे देवा, जलांनी तुला पाहिले; ती भयाने कंपित झाली, खोल जलेही खळबळली. |
|
| 17 |
|
| मेघांनी वर्षाव केला; आभाळ कडाडले; तुझे बाणही सुटले. |
|
| 18 |
|
| तुझ्या गर्जनेचा शब्द झंझावातात होता; विजांचा पृथ्वीवर लखलखाट झाला; भूमी कंपित होऊन डळमळली. |
|
| 19 |
|
| समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावले दिसली नाहीत. |
|
| 20 |
|
| मोशे व अहरोन ह्यांच्या हस्ते तू आपले लोक कळपांप्रमाणे नेले. |
|
|
|
|