|
| 1 |
|
| मी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला; परमेश्वराने माझे ऐकावे म्हणून मी त्यांचा धावा केला. |
|
| 2 |
|
| माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली; रात्रीच्या वेळी न थकता मी त्यांच्याकडे हात पुढे करत राहिलो, तरीही माझे सांत्वन झाले नाही. |
|
| 3 |
|
| परमेश्वरा, मी कण्हत तुमचे स्मरण करतो; मी मनन करताना माझा आत्मा क्षीण झाला आहे. |
|
| 4 |
|
| तुम्ही माझे डोळे बंद होऊ दिले नाही; मला बोलताही येत नव्हते इतका मी खिन्न झालो होतो. |
|
| 5 |
|
| मी पूर्वीच्या दिवसांबद्दल, फार पूर्वीच्या वर्षांबद्दल विचार केला; |
|
| 6 |
|
| रात्रीच्या वेळी मी माझी गाणी आठवीत असे; माझे हृदय विचारमग्न होई आणि माझ्या आत्म्याने विचारले: |
|
| 7 |
|
| “प्रभू कायमचाच आमचा त्याग करतील काय? ते पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाहीत काय? |
|
| 8 |
|
| त्यांची प्रीतिपूर्ण दया कायमची नाहीशी झाली आहे काय? त्यांनी दिलेले अभिवचन पिढ्यान् पिढ्या निष्फळ राहणार काय? |
|
| 9 |
|
| परमेश्वर आपली दया दाखविण्याचे विसरले आहेत काय? क्रोधाने त्यांनी आपला कळवळा रोखून धरला आहे काय?” |
|
| 10 |
|
| मग मी विचार केला, “खरेच माझ्या दुःखाचे कारण हे आहे: की सर्वोच्च प्रभू परमेश्वराने त्यांचा उजवा हात रोखला आहे. |
|
| 11 |
|
| मी याहवेहच्या कृत्यांचे स्मरण करेन; पुरातन काळात त्यांनी केलेल्या अद्भुतकृत्यांची मी आठवण करेन. |
|
| 12 |
|
| मी तुमच्या सर्व कृत्यांचे मनन करेन आणि मी तुमच्या सर्व महत्कार्यांचा विचार करेन.” |
|
| 13 |
|
| हे परमेश्वरा, तुमचे मार्ग पवित्र आहेत. आपल्या परमेश्वरासारखा समर्थ ईश्वर कोणी आहे का? |
|
| 14 |
|
| चमत्कार व अद्भुत गोष्टी करणारे परमेश्वर तुम्हीच आहात; तुम्ही आपले सामर्थ्य लोकांमध्ये प्रगट करता. |
|
| 15 |
|
| जे याकोबाचे आणि योसेफाचे वंशज आहेत, त्यांना तुम्ही आपल्या भुजांनी मुक्त केले आहे. |
|
| 16 |
|
| परमेश्वरा, जलांनी तुम्हाला पाहिले, जलांनी तुम्हाला पाहिले आणि ते धडपडू लागले! त्यांच्या खोल तळापर्यंत धक्का बसला. |
|
| 17 |
|
| मेघांनी मुसळधार पाऊस पाडला; मेघगर्जनेने गडगडाट करून आकाश दुमदुमून टाकले; तुमचे बाण आकाशातून या टोकापासून त्या टोकापर्यंत चमकले. |
|
| 18 |
|
| चक्रीवादळामध्ये गर्जना झाली; विजेच्या लखलखाटाने संपूर्ण जग प्रकाशित झाले; पृथ्वी थरारली आणि डळमळली. |
|
| 19 |
|
| तुमच्या पावलांचे ठसे दिसत नसले, तरी तुमची वाट समुद्रातून गेली होती; तुमचा मार्ग प्रचंड जलाशयातून गेला होता. |
|
| 20 |
|
| मोशे व अहरोन यांच्याद्वारे मेंढरांच्या कळपाप्रमाणे तुम्ही आपल्या लोकांना नेले. |
|
|
|
|