पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मुख्य गवयासाठी; गित्ती चालीवर गायचे दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस. |
| 2 |
| तू बाळके व तान्हुली ह्यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे; तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा ह्यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहेस. |
| 3 |
| आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे तर ― |
| 4 |
| मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे? |
| 5 |
| तू त्याला देवापेक्षा1 किंचित कमी असे केले आहेस; त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस. |
| 6 |
| तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहेस, तू सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले आहेस. |
| 7 |
| शेरडेमेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशू; |
| 8 |
| आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. |
| 9 |
| हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/008.mp3
150
8