पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| आसाफाचे स्तोत्र. देव आपल्या मंडळीत उभा आहे; तो सत्ताधीशांमध्ये1 न्याय करतो; |
| 2 |
| “तुम्ही कोठवर विपरीत न्याय कराल? कोठवर दुर्जनांची तरफदारी कराल? (सेला) |
| 3 |
| गरीब व अनाथ ह्यांचा न्याय करा; दीन व कंगाल ह्यांची दाद घ्या. |
| 4 |
| गरीब व गरजवंत ह्यांना मुक्त करा; दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवा.” |
| 5 |
| त्यांना माहिती नाही व कळतही नाही; ते अंधारात इकडेतिकडे फिरतात; पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ ढळले आहेत. |
| 6 |
| मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात. |
| 7 |
| तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल, एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल.” |
| 8 |
| हे देवा, ऊठ, पृथ्वीचा न्याय कर; कारण तूच सर्व राष्ट्रांचा मालक आहेस. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/082.mp3
150
82