पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| एक गीत; आसाफाचे संगीतस्तोत्र. हे देवा, तू स्तब्ध राहू नकोस. हे देवा, मौन धरू नकोस, स्वस्थ राहू नकोस. |
| 2 |
| कारण पाहा, तुझे शत्रू दंगल करीत आहेत; तुझ्या द्वेष्ट्यांनी डोके वर काढले आहे. |
| 3 |
| ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करतात; तुझ्या आश्रितांविरुद्ध ते मसलत करतात. |
| 4 |
| ते म्हणतात, “चला, आपण त्यांचा असा विध्वंस करू की, ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत; म्हणजे इस्राएलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही.” |
| 5 |
| कारण त्यांनी एकचित्ताने मसलत केली आहे, ते तुझ्याविरुद्ध कट करतात; |
| 6 |
| तंबूंत राहणारे अदोमी व इश्माएली, मवाबी व हगारी, |
| 7 |
| गबाल, अम्मोन व अमालेक, पलेशेथ व सोरकर हे ते आहेत; |
| 8 |
| अश्शूरही त्यांना सामील झाला आहे; त्यांनी लोटाच्या वंशजांना हात दिला आहे. (सेला) |
| 9 |
| मिद्यानाला आणि सीसरा व याबीन ह्यांना कीशोन नदीजवळ तू जसे केलेस, तसे त्यांना कर; |
| 10 |
| ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले. |
| 11 |
| ओरेब व जेब ह्यांच्यासारखे त्यांच्या सरदारांना कर. जेबह व सलमुन्ना ह्यांच्यासारखे त्यांच्या सर्व अमिरांना कर. |
| 12 |
| ते म्हणतात, “देवाची निवासस्थाने2 आपल्या ताब्यात घेऊ या.” |
| 13 |
| हे माझ्या देवा, वावटळीच्या धुरळ्यासारखे, वार्याने उडवलेल्या भुसासारखे त्यांना कर. |
| 14 |
| अग्नी वनाला भस्म करतो, ज्वाला डोंगराला आग लावते, |
| 15 |
| त्याप्रमाणे तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर व आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड. |
| 16 |
| हे परमेश्वरा, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा म्हणून त्यांची मुखे अगदी लज्जित कर. |
| 17 |
| ते सदासर्वकाळ फजीत व भयभीत होवोत; ते लज्जित होवोत, ते नष्ट होवोत; |
| 18 |
| म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वर3 ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू दे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/083.mp3
150
83