मराठी बायबल 2006
|
| 1 |
| सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे. |
| 2 |
| परमेश्वरा, मला वाट पाहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे. मला तुझ्या मंदिरात यायचे आहे. माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे. |
| 3 |
| सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात. ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात आणि तिथे त्यांना पिल्ले होतात. |
| 4 |
| तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात. ते नेहमी तुझी स्तुती करतात. |
| 5 |
| जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात, ते तुला त्यांचे नेतृत्व करु देतात. |
| 6 |
| ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला झऱ्याचे शिशिरातल्या पावसाने निर्माण केलेल्या जलाशयांचे स्वरुप देतो. |
| 7 |
| लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात. |
| 8 |
| सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक याकोबाच्या देवा, माझे ऐक. |
| 9 |
| देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर. तू निवडलेल्या राजाला दया दाखव. |
| 10 |
| तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे. माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे. |
| 11 |
| परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे. देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो. |
| 12 |
| सर्वशक्तिमान परमेश्वरा, जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/084.mp3
150
84