पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मुख्य गवयासाठी; गित्ती चालीवर गायचे कोरहपुत्रांचे स्तोत्र. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत! |
| 2 |
| माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत. |
| 3 |
| हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधण्यास स्थळ मिळाले आहे. |
| 4 |
| तुझ्या घरात राहणार्यांची केवढी धन्यता! ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. (सेला) |
| 5 |
| ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सीयोनेच्या राजमार्गांचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य! |
| 6 |
| शोकजनक1 खोर्यातून जाताना ते त्यांना झर्यांचे स्थानच वाटते; आगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो. |
| 7 |
| ते अधिकाधिक शक्ती पावत जातात, सीयोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. |
| 8 |
| हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक; हे याकोबाच्या देवा, कान दे. (सेला) |
| 9 |
| हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. |
| 10 |
| खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते. |
| 11 |
| कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. |
| 12 |
| हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य! |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/084.mp3
150
84