पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| हे सर्वशक्तिमान याहवेह, तुमचे निवासस्थान किती रम्य आहे! |
| 2 |
| याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी, मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे; माझा जीव व माझा देह जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे. |
| 3 |
| हे सर्वशक्तिमान याहवेह, माझ्या राजा आणि माझ्या देवा, तुमच्या वेद्यांजवळ चिमणीला घरटी बांधण्याचे, व निळवीला देखील आपली पिल्ले ठेवण्याचे ठिकाण सापडले आहे. |
| 4 |
| जे तुमच्या मंदिरात राहू शकतात, ते किती धन्य आहेत; ते निरंतर तुमचे स्तवन करतात. |
| 5 |
| ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत, ज्यांचे अंतःकरण तुमच्या मार्गाचे यात्रेकरू आहेत. |
| 6 |
| ते बाका दरीतून जात असताना, ती त्यांना झर्यांचे स्थान होईल; शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील. |
| 7 |
| सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत, त्यांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढेल. |
| 8 |
| याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका; याकोबाच्या परमेश्वरा, माझे ऐका. |
| 9 |
| हे परमेश्वरा, तुम्ही आमच्या ढालीवर दृष्टी टाका; आपल्या अभिषिक्तावर कृपादृष्टी करा. |
| 10 |
| तुमच्या अंगणात घालविलेला एक दिवस, इतर कुठेही घालविलेल्या सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या मंडपात राहण्यापेक्षा, माझ्या परमेश्वराच्या भवनाचा द्वारपाल होऊन राहण्यात मला अधिक आनंद आहे. |
| 11 |
| कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत; ते आम्हाला कृपा व गौरव देतात; जे निष्कलंक असतात, त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत. |
| 12 |
| सर्वशक्तिमान याहवेह, जे लोक तुमच्यावर भाव ठेवतात, ते कितीतरी धन्य होत. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/084.mp3
150
84