पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाची प्रार्थना. हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे; मी दीन व दरिद्री आहे. |
| 2 |
| माझ्या जिवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणार्या सेवकाचे तारण कर. |
| 3 |
| हे प्रभू, माझ्यावर कृपा कर; कारण मी दिवसभर तुझा धावा करतो. |
| 4 |
| हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर; मी आपले चित्त तुझ्याकडे लावतो. |
| 5 |
| हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणार्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. |
| 6 |
| हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या काकळुतीच्या वाणीकडे लक्ष दे. |
| 7 |
| मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन; कारण तू मला उत्तर देशील. |
| 8 |
| हे प्रभू, देवांमध्ये तुझ्यासमान कोणी नाही, आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीही कृत्ये नाहीत. |
| 9 |
| हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील. |
| 10 |
| कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस. |
| 11 |
| हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. |
| 12 |
| हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जिवेभावे तुझे गुणगान गाईन, तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णन करीन. |
| 13 |
| कारण माझ्यावर तुझी दया फार आहे; अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उद्धरला आहेस. |
| 14 |
| हे देवा, उन्मत्त लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत, जुलमी लोकांचा समुदाय माझा जीव घेण्यास पाहत आहे; ते तुला जुमानत नाहीत. |
| 15 |
| तरी हे प्रभू, तू सदय व कृपाळू देव आहेस; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस. |
| 16 |
| तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे, आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर. |
| 17 |
| हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, ह्यासाठी की, तू माझे साहाय्य व समाधान केले आहेस, हे पाहून माझ्या द्वेष्ट्यांनी लज्जित व्हावे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/086.mp3
150
86