पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| त्यांनी पवित्र पर्वतावर त्यांच्या नगरीचा पाया घातला. |
| 2 |
| याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा, सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे. |
| 3 |
| परमेश्वराच्या नगरी, तुझ्याबद्दल या उत्कृष्ट गोष्टी कथन होतात: |
| 4 |
| “मी नोंद करेन की, राहाब आणि बाबिलोन हे देश माझे अस्तित्व मान्य करतात— पलेशेथ, सोर आणि कूश देखील असेच करतात— ते म्हणतील की, ‘हा सीयोनात जन्मलेला आहे.’ ” |
| 5 |
| खरोखर, त्या दिवसात सीयोनाबाबत म्हटले जाईल, “हा आणि तो सीयोनात जन्मलेला आहे, आणि प्रत्यक्ष देवाधिदेव या शहराला प्रस्थापित करतील.” |
| 6 |
| नागरिकांच्या नोंदवहीत याहवेह लिहितील: “याचा जन्म सीयोनात झाला आहे.” |
| 7 |
| संगीत समारंभात ते गातील, “माझे सर्व झरे तुमच्यामध्येच आहेत.” |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/087.mp3
150
87