|
| 1 |
|
| मी याहवेहच्या महान करुणामय प्रीतीचे सदासर्वदा गुणगान करेन; पिढ्यान् पिढ्या मी तुमच्या विश्वसनीयतेची माझ्या मुखाने साक्ष देईन. |
|
| 2 |
|
| मी जाहीर करेन की, तुमची प्रीती आणि तुमची दया सर्वकाळ टिकणारी आहेत; तुमचे सत्य स्वर्गामध्ये तुम्ही स्थिर केले आहे. |
|
| 3 |
|
| तुम्ही म्हणालात, “माझा निवडलेला सेवक, दावीद, याच्याशी मी एक करार केला आहे; मी शपथ वाहिली आहे की, |
|
| 4 |
|
| ‘दावीदाच्या सिंहासनावर त्याचे वंशज अनंतकाळ राज्य करतील आणि पिढ्यान् पिढ्या विराजमान होतील.’ ” |
|
| 5 |
|
| याहवेह, सारे गगनमंडळ तुमच्या अद्भुत चमत्कारांची स्तुती करीत आहे. भक्तांच्या सभेत तुमच्या विश्वसनीय पावित्र्याचेही गुणगान केले जाते. |
|
| 6 |
|
| कारण याहवेहशी तुलना करता येईल असा स्वर्गात कोण आहे? दिव्यदूतांच्या मंडळात परमेश्वरासमान कोण आहे? |
|
| 7 |
|
| सात्विकांच्या सभेत एकत्र पवित्र परमेश्वराचे भय दिसून येते. त्यांच्याभोवती असणार्या सर्वांपेक्षा ते अधिक भयावह आहेत. |
|
| 8 |
|
| हे याहवेह, सेनाधीश परमेश्वरा, तुमच्यासारखे समर्थ परमेश्वर दुसरे कोणी आहे का? विश्वासूपणाचे वलय तुमच्याभोवती आहे. |
|
| 9 |
|
| भयानक उसळणार्या महासागरांवर तुम्हीच नियंत्रण ठेवता; लाटा उसळताच, तुम्ही त्या शांत करता. |
|
| 10 |
|
| तुम्ही रहाबास असे जमीनदोस्त केले जसे एखादे शव; तुमच्या शक्तिशाली बाहूने तुम्ही शत्रूंची दाणादाण केली. |
|
| 11 |
|
| स्वर्गाचे तुम्ही स्वामी आहात व पृथ्वीही तुमचीच आहे; कारण तुम्हीच ते आणि त्यामधील सगळे काही प्रस्थापित केले आहे. |
|
| 12 |
|
| उत्तर आणि दक्षिण दिशा तुम्हीच निर्माण केल्या; ताबोर व हर्मोन पर्वत तुमच्या नामाचा आनंदाने गजर करतात. |
|
| 13 |
|
| तुमचे बाहू प्रबळ आहेत; तुमचा हात बळकट आहे, उंचावलेला आहे तुमचा उजवा हात. |
|
| 14 |
|
| तुमच्या राजासनाचा पाया नीती व न्याय आहे; करुणामय प्रीती व विश्वसनीयता सतत तुमच्यापुढे चालतात. |
|
| 15 |
|
| याहवेह, तुमचा गौरव करण्याचे जे शिकले, आणि जे तुमच्या प्रकाशाच्या सानिध्यात चालतात, ते धन्य होत. |
|
| 16 |
|
| तुमच्या नामाची प्रशंसा ते दिवसभर आनंदाने करतात; आणि तुमच्या नीतिमत्तेचा उत्सव साजरा करतात. |
|
| 17 |
|
| तुम्हीच त्यांचे गौरव व सामर्थ्य आहात; तुमच्या कृपेद्वारे आमचे शिंग उच्च केले जाईल. |
|
| 18 |
|
| खरोखर याहवेहच आमची संरक्षक ढाल आहेत, आणि आमचा राजादेखील इस्राएलचे पवित्र परमेश्वरच आहेत. |
|
| 19 |
|
| एकदा एका दृष्टान्ताद्वारे तुम्ही आपल्या भक्तांशी बोललात: “एका वीर योद्ध्याला मी सामर्थ्याने परिपूर्ण केले आहे; मी सामान्य लोकातून एक तरुण निवडला आहे; |
|
| 20 |
|
| तो माझा सेवक दावीद, मला मिळाला आहे; माझ्या पवित्र तेलाने मी त्याचा अभिषेक केला आहे. |
|
| 21 |
|
| माझे बाहू त्याला स्थिर करतील; निश्चितच माझे हात त्याला बळकट करतील. |
|
| 22 |
|
| त्याचे शत्रू त्याला पराजित करू शकणार नाहीत; किंवा दुष्ट लोक त्याला पीडणार नाहीत. |
|
| 23 |
|
| मी त्याच्या शत्रूंना त्याच्यासमोर चिरडेन आणि त्याच्या विरोधकांना नष्ट करेन. |
|
| 24 |
|
| माझी सत्यता व करुणा त्याजबरोबर राहील; माझ्या नावानेच त्याचे शिंग उंचाविले जाईल. |
|
| 25 |
|
| मी त्याला समुद्रावर अधिकार देईन, त्याचा उजवा हात नद्यांवर सत्ता गाजवेल. |
|
| 26 |
|
| तो माझा धावा करून म्हणेल, ‘तुम्ही माझे पिता आहात; तुम्ही माझे परमेश्वर, माझ्या तारणाचा खडक आहात.’ |
|
| 27 |
|
| मी त्याची माझा ज्येष्ठपुत्र म्हणून नेमणूक करेन, आणि पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ राजा करेन. |
|
| 28 |
|
| माझ्या करुणामय प्रीतीची छाया त्याजवर सदासर्वकाळ राहील; मी त्याच्याशी केलेल्या कराराचा कधीही अंत होणार नाही. |
|
| 29 |
|
| मी त्याचे वंशज सर्वकाळ सुस्थापित करेन, त्याचे सिंहासन गगनमंडळाच्या अस्तित्वापर्यंत राहील. |
|
| 30 |
|
| “जर त्याच्या मुलांनी माझ्या नियमांचा त्याग केला आणि माझे विधी पाळले नाहीत, |
|
| 31 |
|
| माझ्या आज्ञेचे पालन केले नाही आणि माझे नियम भंग केले, |
|
| 32 |
|
| मी त्यांच्या पापांचा छडीने समाचार घेईन, व दुष्कृत्यांसाठी चाबकाच्या फटकार्यांची शिक्षा करेन. |
|
| 33 |
|
| पण मी माझी प्रेममयदया त्याच्यापासून कधीही काढून घेणार नाही व माझी सत्यता मी त्यागणार नाही. |
|
| 34 |
|
| मी माझा करार मोडणार नाही; मी जे बोललो त्यातील एक शब्दही बदलणार नाही. |
|
| 35 |
|
| सर्वकाळासाठी एकदाच दावीदाला माझ्या पवित्रतेची शपथ दिली— मी दावीदाशी खोटे बोलणार नाही— |
|
| 36 |
|
| दावीदाचा वंश सर्वकाळ टिकेल आणि त्याचे सिंहासन माझ्यासमोर सूर्यासमान काळाच्या अंतापर्यंत राहील. |
|
| 37 |
|
| आकाशातील विश्वसनीय साक्षीदार चंद्राप्रमाणे त्याचे सिंहासन युगानुयुग सुस्थिर राहील.” |
|
| 38 |
|
| मग माझा अव्हेर करून तुम्ही मला का दूर लोटले? तुम्ही तुमच्या अभिषिक्तावर एवढे संतप्त झाला आहात. |
|
| 39 |
|
| तुमच्या सेवकाशी केलेला करार तुम्ही झुगारून दिला आहे; आणि त्याचा राजमुकुट धुळीत फेकून तो भ्रष्ट केला आहे. |
|
| 40 |
|
| त्याचे रक्षण करणारे तट तुम्ही मोडून टाकले आहेत; त्याचा प्रत्येक किल्ला तुम्ही जमीनदोस्त केला आहे. |
|
| 41 |
|
| येणारा जाणारा प्रत्येकजण त्याला लुबाडतो; आणि तो त्याच्या शेजार्यांकरिता घृणापात्र झाला आहे. |
|
| 42 |
|
| तुम्ही त्याच्या शत्रूचा उजवा हात उच्च केला आहे; आणि त्यांना हर्षित केले आहे. |
|
| 43 |
|
| तुम्ही त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहे आणि लढाईत त्याला मदत करण्याचे नाकारले आहे. |
|
| 44 |
|
| तुम्ही त्याचे वैभव नष्ट केले आहे आणि त्याचे सिंहासन धुळीत टाकले आहे. |
|
| 45 |
|
| त्याच्या तारुण्याचे दिवस खुंटविले आहेत; आणि त्याला लज्जेच्या वस्त्राने पांघरले आहे. |
|
| 46 |
|
| हे याहवेह, असे कुठवर चालणार? तुम्ही स्वतःला सर्वकाळ लपवून ठेवणार काय? कुठवर तुमचा क्रोधाग्नी भडकत राहणार? |
|
| 47 |
|
| माझ्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेचे स्मरण करा. तुम्ही मानवाला किती व्यर्थ जीवन जगण्यासाठी निर्माण केले! |
|
| 48 |
|
| कोण सर्वकाळ जगेल व ज्याला मरणाचा अनुभव येणार नाही, कोण स्वतःला अधोलोकाच्या सत्तेपासून सोडवू शकेल? |
|
| 49 |
|
| हे परमेश्वरा, तुमच्या पूर्वीच्या महान प्रीतीची शपथ, जी तुम्ही दावीदाशी विश्वासूपणे केली होती, ती आता कुठे गेली? |
|
| 50 |
|
| हे परमेश्वरा, तुमच्या सेवकाची कशी थट्टा झाली याची आठवण करा, माझ्या ह्रदयात सर्व देशांचा तिरस्कार मी कसा सहन करू! |
|
| 51 |
|
| याहवेह, हे सर्व अपमान जे तुमच्या शत्रूंनी केले, त्या उपहासाचे प्रहार पावलोपावली तुमच्या अभिषिक्ताला मिळाले. |
|
| 52 |
|
| याहवेहचे सदासर्वकाळ स्तवन होवो! आमेन व आमेन. |
|
|
|
|