|
| 1 |
|
| याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन; मी तुमच्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन. |
|
| 2 |
|
| मी आनंदित होईन आणि तुमच्यामध्ये हर्ष करेन; हे सर्वोच्च प्रभू, मी तुमच्या नावाची स्तुतिस्तोत्रे गाईन. |
|
| 3 |
|
| माझे शत्रू मागे वळतात; ते तुमच्यासमोर अडखळतात आणि नष्ट होतात. |
|
| 4 |
|
| कारण तुम्ही माझे अधिकार आणि न्यायाला पाठिंबा दिला आहे, तुम्ही नीतिमान न्यायाधीश म्हणून सिंहासनावर बसलेले आहात. |
|
| 5 |
|
| तुम्ही राष्ट्रांना धमकाविले आहे आणि दुष्टांना नष्ट केले आहे; त्यांची नावे तुम्ही कायमची पुसून टाकली आहेत. |
|
| 6 |
|
| माझे शत्रू कायमचे नष्ट झाले आहेत, तुम्ही त्यांची नगरे उद्ध्वस्त केली; त्यांची आठवणसुद्धा नाहीशी झाली आहे. |
|
| 7 |
|
| याहवेह सिंहासनावर सदासर्वकाळ विराजमान आहेत; न्यायनिवाडा करण्याकरिता त्यांनी आपले सिंहासन स्थापिले आहे. |
|
| 8 |
|
| ते नीतिमत्तेने जगावर राज्य करतात आणि समानतेने लोकांना रास्त न्याय देतात. |
|
| 9 |
|
| याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत, संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत. |
|
| 10 |
|
| ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही. |
|
| 11 |
|
| सीयोनच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या याहवेहची स्तुतिस्तोत्रे गा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर करा. |
|
| 12 |
|
| जे रक्तपाताचा सूड घेतात, ते आठवण ठेवतात; दीनांच्या आक्रोशाकडे ते दुर्लक्ष करीत नाही. |
|
| 13 |
|
| हे याहवेह, माझे शत्रू माझा कसा छळ करतात ते पाहा! मजवर दया करा आणि मृत्यूच्या दारातून मला ओढून काढा, |
|
| 14 |
|
| मग मी सीयोनकन्येच्या वेशींवर तुमची स्तुतीची घोषणा करेन, आणि तुमच्या तारणात आनंद करेन. |
|
| 15 |
|
| दुसर्यांसाठी खणलेल्या खाचेतच राष्ट्रे पडली आहेत; स्वतःच लपवून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचे पाय अडकले आहेत. |
|
| 16 |
|
| याहवेहची नीतिपूर्ण कृत्ये हीच त्यांची ओळख आहे; दुष्ट स्वतःच्याच हस्तकर्माच्या सापळ्यात अडकले आहेत. |
|
| 17 |
|
| परमेश्वराला विसरणारी सर्व दुष्ट राष्ट्रे मृतांच्या राज्यात पाठविली जातात. |
|
| 18 |
|
| परंतु परमेश्वराला गरजवंताचा कधीही विसर पडत नाही; दुःखितांच्या आशा कधीही नष्ट होणार नाहीत. |
|
| 19 |
|
| याहवेह, उठा, नाशवंत मानवाला विजयी होऊ देऊ नका; राष्ट्रांचा न्याय तुमच्यासमोर होऊ द्या. |
|
| 20 |
|
| याहवेह, त्यांच्यावर भयाचा प्रहार करा; आपण केवळ नाशवंत आहोत याची राष्ट्रांना जाणीव होऊ द्या. |
|
|
|
|