पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| देवाचा भक्त मोशे ह्याची प्रार्थना. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हांला निवासस्थान आहेस. |
| 2 |
| पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग निर्माण केलेस त्यापूर्वीच अनादि कालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस. |
| 3 |
| तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस, आणि म्हणतोस, “अहो मानवांनो, परत जा.” |
| 4 |
| कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षें कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. |
| 5 |
| तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस; ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत,1 सकाळी उगवणार्या गवताप्रमाणे ते आहेत; |
| 6 |
| सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. |
| 7 |
| कारण आम्ही तुझ्या क्रोधाने भस्म होतो, तुझ्या संतापाने आम्ही घाबरून जातो, |
| 8 |
| तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत; आमची गुप्त पातके आपल्या मुखप्रकाशात ठेवली आहेत. |
| 9 |
| तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात; आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवतो. |
| 10 |
| आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. |
| 11 |
| तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते? आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे? |
| 12 |
| ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. |
| 13 |
| हे परमेश्वरा, परत फीर; किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकांवर करुणा कर. |
| 14 |
| तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. |
| 15 |
| जेवढे दिवस तू आम्हांला पिडले, जेवढी वर्षे आम्ही अरिष्ट पाहिले त्या मानाने आम्हांला आनंदित कर. |
| 16 |
| तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे. |
| 17 |
| परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो; आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने, आमच्या हातचे काम सिद्धीस ने. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/090.mp3
150
90