पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| शब्बाथ दिवशी गायचे संगीतस्तोत्र. परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. |
| 2 |
| प्रभातसमयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे, |
| 3 |
| दशतंतुवाद्य, सतार व वीणा ह्यांच्या साथीने, गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. |
| 4 |
| कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहेस; तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जयजयकार करतो. |
| 5 |
| हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत |
| 6 |
| पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की, |
| 7 |
| दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच. |
| 8 |
| हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ उच्च स्थानी आहेस. |
| 9 |
| हे परमेश्वरा, पाहा, तुझे वैरी, पाहा, तुझे वैरी नाश पावतील; सर्व दुष्कर्म्यांची दाणादाण होईल. |
| 10 |
| पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगांप्रमाणे उन्नत केले आहेस, मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. |
| 11 |
| माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत; माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. |
| 12 |
| नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. |
| 13 |
| जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. |
| 14 |
| वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील; |
| 15 |
| ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठायी अन्याय मुळीच नाही. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/092.mp3
150
92