मराठी बायबल 2006
|
| 1 |
| परमेश्वर राजा आहे. त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे. तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे. ते कंपित होणार नाही. |
| 2 |
| देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे. देवा, तू सदैव जीवंत आहेस. |
| 3 |
| परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे. |
| 4 |
| समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि त्यांचा आवाज खूप मोठा आहे. परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे. |
| 5 |
| परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील. तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/093.mp3
150
93