पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| परमेश्वर राज्य करतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे; म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. |
| 2 |
| तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे; तू अनादि कालापासून आहेस. |
| 3 |
| हे परमेश्वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे; नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे. |
| 4 |
| विपुल जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्च स्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे. |
| 5 |
| तुझे निर्बंध अभंग आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/093.mp3
150
93