पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेह राज्य करतात; ऐश्वर्याची वस्त्रे त्यांनी परिधान केली आहेत; याहवेहनी राजेशाही वस्त्रे परिधान केली आहेत आणि ते शक्तीने सुसज्जित आहेत; निश्चितच, त्यांनी पृथ्वी अत्यंत स्थिर व अढळ केलेली आहे. |
| 2 |
| तुमचे सिंहासन अनादिकालापासून स्थापलेले आहे; तुम्ही अनंतकाळापासून आहात. |
| 3 |
| याहवेह, महासागर उसळत आहेत; महासागरांनी त्यांचा स्वर उंच केलेला आहे; समुद्राच्या प्रचंड लाटांचा प्रहार उग्र होत आहे. |
| 4 |
| सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली, तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात— सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत. |
| 5 |
| हे याहवेह, तुमच्या आज्ञा अटळ आहेत; पवित्रता हे तुमच्या भवनाचे अनंतकाळचे आभूषण आहे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/093.mp3
150
93