|
| 1 |
|
| याहवेह, सूड घेणारे परमेश्वर आहेत, हे सूड घेणारे याहवेह, प्रज्वलित व्हा. |
|
| 2 |
|
| पृथ्वीच्या न्यायाधीशा उठा; गर्विष्ठांचा यथार्थ सूड घ्या. |
|
| 3 |
|
| याहवेह, कुठवर दुष्कर्मी, हे दुष्ट कुठवर जयोत्सव करणार? |
|
| 4 |
|
| ते उन्मत्त शब्दांचा वर्षाव करतात; सर्व दुष्कर्मी बढाईखोरीने भरलेले आहेत. |
|
| 5 |
|
| हे याहवेह, ते तुमच्या लोकांना तुडवितात; तुमच्या वारसांना ते छळतात. |
|
| 6 |
|
| ते विधवा, निर्वासितांचा वध करतात; आणि अनाथांचा जीव घेतात; |
|
| 7 |
|
| ते म्हणतात, “याहवेह पाहत नाहीत; याकोबाचा परमेश्वर लक्ष देत नाही.” |
|
| 8 |
|
| विचार करा, या लोकांमधील मूर्खांनो; निर्बुद्ध्यांनो, तुम्हाला शहाणपण कधी येणार? |
|
| 9 |
|
| ज्यांनी कान जडले ते बहिरे आहेत काय? ज्यांनी डोळे घडविले त्यांना दृष्टी नाही काय? |
|
| 10 |
|
| जे राष्ट्रांना शिस्त लावतात, ते शिक्षा करणार नाहीत काय? जे मानवाला शिक्षण देतात, त्यांना ज्ञानाची कमतरता असेल काय? |
|
| 11 |
|
| याहवेह मनुष्याचे सर्व विचार जाणतात; ते निरर्थक असतात हे त्यांना ठाऊक आहे. |
|
| 12 |
|
| याहवेह, धन्य तो पुरुष, ज्याला तुम्ही शिस्त लावता, ज्याला तुम्ही तुमचे विधिनियम देण्यासाठी निवडले आहे; |
|
| 13 |
|
| जोपर्यंत दुष्टासाठी खाच खोदली जात नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला विपत्तीपासून विसावा देता. |
|
| 14 |
|
| याहवेह आपल्या प्रजेचा त्याग करणार नाहीत; त्यांच्या वारसांना ते कधीही टाकणार नाहीत. |
|
| 15 |
|
| न्यायनिवाडा पुन्हा न्यायीपणानेच होईल, आणि नीतिमान हृदयाचे त्याचे पालन करतील. |
|
| 16 |
|
| माझ्यातर्फे दुष्ट लोकांविरुद्ध कोण उभा राहील? कुकर्मी लोकांविरुद्ध माझ्याकडून कोण लढेल? |
|
| 17 |
|
| याहवेहने मला साहाय्य केले नसते, तर मी केव्हाच मरणाच्या निःशब्दतेत निवास केला असता. |
|
| 18 |
|
| “हे याहवेह, मी घसरत आहे,” असा मी धावा केला, तेव्हा त्यांच्या करुणामय प्रीतीने मला सावरले. |
|
| 19 |
|
| जेव्हा माझे अंतःकरण व्याकूळ झाले, तेव्हा तुमच्या सांत्वनाने मला हर्षित केले. |
|
| 20 |
|
| भ्रष्ट सिंहासन तुमच्याशी संघटित होईल काय— जे अन्यायी कायदे लागू करून दुर्दशा करतात? |
|
| 21 |
|
| दुष्ट नीतिमानाविरुद्ध एकत्र होतात, आणि निरपराध्यास मृत्युदंड देतात. |
|
| 22 |
|
| परंतु याहवेह माझा दुर्ग झाले आहेत, आणि तेच माझे परमेश्वर, माझ्या आश्रयाचे खडक. |
|
| 23 |
|
| तेच त्यांच्या दुष्टतेचा सूड घेतील, आणि त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांचा नाश करतील; याहवेह आमचे परमेश्वर त्यांचा नायनाट करतील. |
|
|
|
|