पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर. |
| 2 |
| परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. |
| 3 |
| राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. |
| 4 |
| कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. |
| 5 |
| कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती1 आहेत; परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे. |
| 6 |
| मान व महिमा त्याच्यासमोर आहेत; सामर्थ्य व सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत; |
| 7 |
| अहो मानवकुलांनो, परमेश्वराचा गौरव करा; परमेश्वराचा गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. |
| 8 |
| परमेश्वराच्या नावाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या; |
| 9 |
| पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा; हे सर्व पृथ्वी त्याच्यापुढे कंपायमान हो. |
| 10 |
| राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो. जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळणार नाही. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.” |
| 11 |
| आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्लास करो, समुद्र व त्यातील सर्वकाही गर्जना करोत; |
| 12 |
| शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत; मग वनांतील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील; |
| 13 |
| कारण तो आला आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे; तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/096.mp3
150
96